ग्राम पालांदूरच्या कुंभारपुरीत अवतरले कान्हा अनं गणेशजी...
![ग्राम पालांदूरच्या कुंभारपुरीत अवतरले कान्हा अनं गणेशजी...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64eecdd09c413.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - दीनदयाल गिऱ्हेपुंजे, लाखनी
भारत हा सण - उत्सवांचाच देश.! येथे वर्षभर विविध सणांची रेलचेल असते. त्यातच श्रावण मासातील जन्माष्टमी व भाद्रपद महिण्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या निमित्त; अनेक भक्तमंडळी आपापल्या घरी कन्हैया व गणेशाचे पूजन करतात. परंतु त्याआधीच पालांदूर येथील कुंभारपुरीत घरोघरी कन्हैया व गणेशजींचे आगमन झालेले आहे.
पारंपरिक कलेचा वारसा जपत व हस्तकौशल्याचा वापर करत कुंभारपुरीतील २० - २५ कलाकार आपल्या कल्पनाशक्तीला हस्तकलेची जोड देत कालीयामर्दन, रासलिला, मयुरेश्वर, गायी चारणे, पुर्णावतार, कंसवध, बाललीला ई. कृष्ण जीवनलीलांच्या आठवण करुन देणाऱ्या कृष्णमूर्ती, तर पगडी-फेटेधारी, मुषकसवारी, सिंहारुढ व त्रिशूल - शंख, कमळधारी भगवान गणेशांच्या आकर्षक व सुंदर मुर्ती साकारत आहेत.
दोन्ही सण अगदी थोड्या दिवसांवर येऊन ठेपले असताना; वर्षभर गावातीलच मातीला चाकावर आकार देणारे हे गरीब कुटुंब उदरनिर्वाहासाठी आपल्या अंगी असलेल्या कलेला प्रत्येक्ष मूर्तीरुपांत उतरवित आहेत.