तळेगाव दिं. येथे अमृत कलशाची गावातून काढली शोभा याञा...

तळेगाव दिं. येथे अमृत कलशाची गावातून काढली शोभा याञा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

देशासाठी बलिदान दिलेल्या शहिद विरांच्या स्मृतिंना उजाळा देण्यासाठी आणी नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील तळेगाव दिं येथिल  ग्रामपंचायत कार्यालया येथुन प्रथमत: अमृत कलशाचे पुजन गावच्या सरपंच सोनाली चारोस्कर, उपसरपंच प्रविण कथार, गायञी मिसाळ, ग्रामसेविका एस. वाय. बत्तीसे व उपस्थित ग्रामस्थ यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तर  स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार तर्फे संपुर्ण देशात माझी माती माझा देश अभियान राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातही माझी माती माझा देशअभियाना अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये अमृत कलश याञा काढण्यात आली. १आक्टोंबर पर्यंत या कलशाचे संकलन तालुका स्तरावरपंचायत समिती कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे. सर्व गावांमधुन जमा करण्यात आलेल्या कलशातील माती एकञीत करून, तालुकास्तरावर प्रातीनिधीक कलश तयार करण्यात येईल. अमृत कलशाची सवाद्य मिरवणुक गावातुन काढण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व संपुर्ण गाव परिसरातून ढोल ताशांच्या गजरात सवाद्य अमृत कलशाची मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थीनींनी अमृत कलश डोक्यावर ठेवून यामध्ये गावातील ग्रामस्थ यांनी आपल्या शेतातील माती अमृत कलशामध्ये टाकली. तर काही ग्रामस्थ महिला भगीनींनी एक मुठ तांदुळ मातीच्या कलशात जमा करण्यात आले आहे. उन्नती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींनी लेझीम पथकाद्वारे कार्यक्रमात सहभाग नोंदविला जि.प.प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसमवेत शपथ घेण्यात आली.

यावेळी सरपंच सोनाली चारोस्कर, उपसरपंच प्रविण कथार, ग्रामपंचायत सदस्य गायञी मिसाळ, ग्रामसेविका एस.वाय.बत्तीसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद कथार, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सागर चारोस्कर, प्रकाश मोंढे, माजी सरपंच अजय चारोस्कर, मोतीराम बेंडकुळे, सागर चकोर, जि.प.प्रा. शाळेचे शिक्षक कुंदा निकम, वंदना कदम, प्रकाश भामरे, अशोक देवरे, ज्योती अहिरे, उन्नती विद्यालयाचे शिक्षक अमोल पवार, रोहन कोराळे, संतोष चारोस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन शाळेचे मुख्यध्यापक धनंजय आहेर यांनी केले. तर प्रास्ताविक उन्नती विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पितृभक्त यांनी मानले.