मराठवाड्यासह विदर्भात भुकंपाचे धक्के.! ४.५ रिश्टर स्केलची नोंद
![मराठवाड्यासह विदर्भात भुकंपाचे धक्के.! ४.५ रिश्टर स्केलची नोंद](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_668e163805aab.jpg)
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
मराठवाड्यासह विदर्भात आज (दि.10 जुलै) सकाळी हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यात ७ वाजुन १५ मि. ने भुकंपाचे सौम्यधक्के जावले आहेत.
भूकंपाचे धक्के जानवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन प्रशासणाच्यावतीने करण्यात आले आहे.
कळमनुरी aअ वसमत तालुक्यात नेहमीच जमिनितुन गुढ आवाज येत असतात; या भुकंपाची ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती जिल्हा अपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे, अचानक झालेल्या भुकंपाने घरातील भाड्याची पडझड होऊ लागल्याने, नागरिक चांगलेच भयभित झाले व घराबाहेर पडले होते. दरम्यान प्रशासनाने नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात अनेकदा भुकंपाचे धक्के बसले असून, आता पर्यंतचा हा सर्वात मोठा भुकप आहे. गोरेगाव, सुरजखेडा, माझोड, कडोळी यासह अनेक गावातील मातीच्या घराची भुकंपाने पडझड झाली आहे. तर काही भिंतीला तडे देखील गेले आहेत. परंतु या भुकंपामुळे कोनतिही जिवीतहानी झाली नाही.