संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे हरिनामच्या जयघोषत, त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक : पाऊले चालती पंढरीची वाट, माझ्या जीवाची आवडी नेई पंढरपुरा गुढी.! अशा प्रसन्नमय वातावरणात संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. हजारो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीमध्ये सहभाग घेऊन मार्गक्रमण केले. प्रस्तावनात एकूण ५० दिंड्या दाखल झाले आहेत. सुमारे २० हजार वारकरी सहभाग झाले आहेत.
यावेळी नगरपालिकेच्यावतीने पालखीचे कुशावर्त तीर्थावर स्वागत करण्यात आले. नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवाचक्के यांच्या हस्ते पादुकांना जलाअभिषेक करण्यात आला.माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांची बैलजोडी रथाला जिंकण्यात आली होती.पालखी सोहळ्यासाठी खासदार हेमंत गोडसे सह मान्यवर उपस्थित होते.
प्रथमता संत निवृत्तीनाथ मंदिरात महापूजा होऊन रथाची पूजन झाले.चांदीच्या रथात संत निवृत्तीनाथांची पादुका,मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. निवृत्तीनाथांच्या संजीवनी समाधी समोर वारकरी आल्यानंतर संस्था तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला.या पालखी सोहळ्यात अनेक उपक्रम राबविण्यात आले. या मध्ये पर्यावरण वाचवण्याचा संदेश याशिवाय नाचणारा अश्व ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू ,रांगोळ्यांची सजावट, मिरवणुकीमध्ये एका भाविकांनी बजरंग बलीचा मुखवटा धारण करून उपस्थित त्यांना आशीर्वाद देत होता केलेला होता. वारीमध्ये सहभागी दिंडी प्रमुखांना मंदिर संस्थेतर्फे नारळ व श्री निवृत्तीनाथाची प्रतिमा देऊन गौरवण्यात आले.मिरवणुकीमध्ये परिसरातील गावांमधील नागरिक येऊन सहभागी झाले होते. या नागरिकांनी त्यांच्या लहान मुलांनाही पालखीच्या दर्शनासाठी आणले होते. ही लहान बालके फार काळ पायी चालू शकत नसल्यामुळे काहीजणांनी त्यांना कडेवर घेतले होते. तर काहींनी बालकांना खांद्यावर बसून मिरवणूक दाखवली अनेक बालके आपल्या पालकांच्या खांद्यावर बसून मिरवणुकीचा आनंद लुटत होते. या पालखी सोबत अनेक दिंड्या सहभागी झाल्या असून काही दिंड्या मार्गामध्ये पालखीत सामील होणार आहे २७ दिवसांच्या प्रवासानंतर २८ जून रोजी पालखी पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे.