महाळुंगे कमानी जवळ एकाला चोपले...!

महाळुंगे  कमानी जवळ एकाला चोपले...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : नाणेकरवाडी येथील विकास गणेश चव्हाण(वय-३९ वर्षे) यास एका व्यक्तीकडून मारहाण झाल्याची घटना महाळुंगे येथे घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, १ जून २०२३ रोजी ८ वाजताच्या सुमारास फिर्यादी हा महाळुंगे कमान येथून आपल्या राहत्या घरी नाणेकरवाडी येथे चालला असताना तेथे रितेश पवार रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे नामक व्यक्ती रस्त्यावर त्याची लाल रंगाची गाडी एम एच १४ जी वाय ८२२७ ही उभी करून उभा होता. त्याला फिर्यादी याने गाडी बाजूला घेण्यास संगितले असता रितेश पवार याने गाडीच्या खाली उतरून फिर्यादीला शिवीगाळ करत फिर्‍यादीच्या अंगावर धावून येवून त्याच्या हाताच्या मनगटात असलेल्या स्टीलच्या कड्याने फिर्यादीच्या तोंडावर व डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. व फिर्यादीला परत तू माझ्या नादी लागला तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. या घडलेल्या घटनेच्या बाबत महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध भा.द.वि. कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदाड बांगर हे करत आहेत..