शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद.! आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी...
![शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद.! आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65b8b24d51d82.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ
लातूर : शिरूर अनंतपाळ येथे सर्व हिंदू बांधवाच्या वतीने वलांडी ता. देवणी येथे अत्याचार झालेल्या अल्पवयीन हिंदू खाटीक समाज भगिनींवर कृत्य करणाऱ्या अल्ताफ मेहबूब कुरेशी या आरोपीस कठोर कार्यवाही करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी शहरात शाळा, कॉलेज, मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
अत्याचारित पीडित मुलगी वलांडी येथील असून, तिच्यावर नराधम अल्ताफ मेहबूब कुरेशी ह्याने सतत पाच दिवस अमानुषपणे कृत्य करून जीवे मारण्याची धमकी दिली. तरी यास कठोर कार्यवाही करून पिडीतेस न्याय मिळवून देण्याची मागणी तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांच्याकडे करण्यात आली. शिरूर अनंतपाळ शहरात तरुणांनी सर्वांना आव्हान करीत व्यापार, शाळा, कॉलेजसनी प्रतिसाद देत कडकडीत बंदमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे