अजित पवार गटाच्या खेड तालुक्यातील एका बड्या नेत्याच्या घरी आयकर विभागाची धाड, चाकण मधील अनेकांचे धाबे दनाणले..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण :: खेड तालुक्यातील अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या घरी (दि. २८)पहाटे आयकर विभागाची धाड पडल्याने चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच या धाडीमुळे अनेक राजकीय व व्यवसायिक व्यक्तीचे धाबे दनाणले आहेत. विशेष म्हणजे हा राजकीय नेता ट्रान्सपोर्ट व जमीन खरेदी विक्री व्यवहारातील असल्याने यांच्या घराची व सापडलेल्या कागदपत्रांची कसून चौकशी आयकर विभागाकडून करण्यात येत आहे.
चाकण परिसरात बरेच रूम भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. त्यातील बऱ्याच अशा व्यक्ती आहेत की त्या जमा होत असलेल्या भाड्याचा एकही रुपयाचा आयकर विवरण(Income Tax) देत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे रुमाच्या माध्यमातून जमा होणारा पैसा हा पूर्णपणे रोख स्वरूपात स्वतः जवळच ठेवत असल्याने अनेक धनाड्या व्यक्तीचे या कारवाई मुळे तोंडचे पाणी पळाले आहे.
चाकण परिसरात झालेली आयकर विभागाची कारवाईचे मुंबई कनेक्शन असल्याचीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईत सापडलेल्या कागदपत्रात आणि धाड पडलेल्या राजकीय नेत्याकडून अजून कोण कोणती माहिती समोर येते हेचं पहावे लागेल. पण या कारवाईमुळे कुठे तरी शासनाची फसवणूक करणारे बडे धनाडीक यांची पळता भुई थोडी झाली हे नक्की...