सोमवार दि. 23 ऑक्टोंबर रोजी; दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक...
![सोमवार दि. 23 ऑक्टोंबर रोजी; दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_653569972f16a.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील वनी येथे सोमवार दि.२३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. वनी येथील कृष्ण गाव जवळील फॉरेस्ट रेस्ट हाऊस येथे; कादवा कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बैठकीला जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, दत्तात्रय पाटील, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे उपस्थित राहणारा असून, या बैठकीला तालुक्यातील राष्ट्रवादीची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी कादवा संचालक, बाजार समिती माजी संचालक, माजी जि.प. सदस्य माजी, प.सं.सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन; तालुका अध्यक्ष भास्कर भगरे, राष्ट्रवादी युवक जिल्हा शाम हिरे, शहराध्यक्ष नरेश देशमुख, युवक विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे आदींनी केले आहे.