अवैध धंदे बंद करण्यासाठी महिलांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा...

अवैध धंदे बंद करण्यासाठी महिलांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील जालखेड, चाचडगाव व परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरु असून त्वरीत कायमस्वरुपी अवैध धंदे बंद करण्यात यावे,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी, आदिशक्ती दारु कमिटी महिला ग्रुप  तसेच जालखेड,चाचडगाव गावातील महिला वर्गाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दिंडोरी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारु विक्री, जुगार,  सोरट आदी अवैध धंद्यांचा सर्रासपणे सुरु आहे.याबाबत अनेक वेळा निवेदन दिलेली आहे.परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.महिलांनी अनेकवेळा जीव धोक्यात घालुन त्यांना त्याची दारु पकडण्याचा प्रयत्न केला पण ते अरेरावी भाषा वापरत शिविगाळ करुन जिवे मारण्याचा धमक्या दिल्या जातात. बचत गटाच्या महिलांना सरकार एका बाजूला पुढे आणण्यासाठी सर्वातरी प्रयत्न करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला महिलांना असा त्रास तरी याचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा रास्ता रोको  आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष शैला उपाडे व महिला वर्गाने दिला आहे.