ऊस दर नियंत्रण समितीवर योगेश बर्डे यांची निवड...

ऊस दर नियंत्रण समितीवर योगेश बर्डे यांची निवड...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथील ऊस उत्पादक व उपसरपंच योगेश बर्डे यांची; महाराष्ट्र राज्याच्या ऊस दर नियंत्रण समितीवर नुकतीच निवड झाली असून, निवडीचे पत्र सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

ऊस दर नियंत्रण समितीवर महाराष्ट्रातील दहा प्रतिनिधींची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली जाते. त्यापैकी सहकारी साखर कारखान्याचे दोन, खाजगी साखर कारखान्यांची तीन तर महाराष्ट्र राज्यातून पाच शेतकरी प्रतिनिधींची निवड सहकार खात्यामार्फत केली जाते. यात नाशिक जिल्ह्यातून शेतकरी प्रतिनिधी म्हणून योगेश बर्डे यांची निवड करण्यात आली.

राज्यातील उसउत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना यशस्वी राबवून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, नवनिर्वाचित सदस्य योगेश बर्डे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीचे तालुक्यातील उसउत्पादक शेतकऱ्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.