कळमनुरी विधानसभा मतदारसंघात होत असलेली बोगस मतदान नोंदणी रद्द करण्याची शिवसेनेची मागणी
![कळमनुरी विधानसभा मतदारसंघात होत असलेली बोगस मतदान नोंदणी रद्द करण्याची शिवसेनेची मागणी](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_669feedacd487.jpg)
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काही बीएलओ मार्फत बोगस मतदान नोंदणी होत असल्याने तात्काळ या बोगस मतदार नोंदणीची चौकशी करुन बोगस नोंदणी रद्द करून संबधित बीएलओ वर कार्यवाही करावी या मागणी संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने दि.२३जुलै रोजी उपविभागीय अधिकारी क्रांती डेंबे यांना मागणीचे निवेदनाद्वारे केले.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावामध्ये मतदार यादीमध्ये बोगस मतदारांची नोंदणी होत असल्याचे प्रकार वाढले आहेत काही बीएलओ हे इतर जिल्ह्यातील मतदाराचा मतदारसंघात कुठलाही संबंध नसताना पुरावा नसताना मतदान यादी मध्ये नविन नाव समाविष्ट करित असलेल्याचे प्रकार दिसुन येत आहेत या बोगस मतदार नोंदणी होत असल्याने या मतदार संघात मतदखनाचा आकडा वाढला आहे या बोगस मतदाराची पडताळणी करुन नोंदणी केलेले बोगस मतदान रद्द करावे व संबंधित बीएलओ वर कार्यवाही करावी अशी मागणी केली. यावेळी मोठ्यासंख्येने शिवसेना पदधिकारी यांची उपस्थिती होती.