उजळंब येथील शेकडो कार्यकर्त्यांचा बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश...
![उजळंब येथील शेकडो कार्यकर्त्यांचा बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65b13a36ac75e.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
चाकूर तालुक्यातील उजळंब येथील शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षात; अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांच्या उपस्थितीत आयोजीत पक्षाच्या प्रवेश सोहळ्यात जाहीर प्रवेश केला आहे.
उत्तमराव वाघ यांनी पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, मोठे उद्योग नाहीत, विकासाचा बँकलॉक भरून काढायचा असेल तर बीआरएस पक्षाच्या पाठीमागे रहावे, अब की बार गरीबांचा आमदार म्हणून २०२४ ला संधी द्यावी. राजकारणातली घराणेशाही बंद करा, गरीब शेतकऱ्यांची ताकद यावेळी दाखवून द्यायची आहे असे सांगितले.
या प्रवेश सोहळ्याचे अध्यक्ष तंटामुक्त अध्यक्ष गणपतराव जाधव, प्रमुख पाहुणे सरपंच दत्ताञय इंद्राळे, माजी सरपंच सुधाकर कुलकर्णी, उपसरपंच भगवानराव मुठ्ठे, चेरमन सोमनाथ इंद्राळे, माजी सरपंच दत्तु थोरात, माजी सैनिक दिलीपराव जाधव, माजी चेअरमन उध्दव थोरात, माजी सरपंच श्रीकृष्ण नाईकवाडे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामदेवतांची पुजा आरती उत्तमराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आली.
उजळंब गावातून उत्तमराव वाघ यांची वाजत गाजत रँली काढण्यात आली. या वेळी गावकरी व बी आर एस पक्षाचे पधादिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज 15मराठीसाठी असलम शेख लातुर,