आमचे ठरले, स्वर्गीय आमदार सुरेश गोरेचे कुटूंब शिंदे गटात प्रवेश करणार, तारीख ठरली..?
![आमचे ठरले, स्वर्गीय आमदार सुरेश गोरेचे कुटूंब शिंदे गटात प्रवेश करणार, तारीख ठरली..?](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63edafa912650.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : मुळ शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांचे कुटुंब लवकरच बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती News15 मराठीच्या हाती लागली आहे.
मागील बऱ्याच दिवसापासून मूळ उद्धव ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांचे कुटुंब शिवसेनेत दुफळी पडल्यानंतर कुणाच्या गटात आपले राजकीय स्थित्यांतर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात मूळ शिवसेनेची बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे राजकीय उलाथा पालथीतून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर तालुक्यातील खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, राजेंद्र जवळेकर, अशोक भुजबळ, ज्योती अरगडे, अक्षय जाधव, दत्ता राऊत, धनंजय पठारे यांच्या सारख्या नेत्यांनी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची सोबत धरून शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा धाडशी निर्णय घेतला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा उभ्या तालुक्याने पाहिलेला संघर्षही कारणीभूत असल्याची चर्चा तालुक्यात सुरुवातीला रंगली होती.
राज्यातील शिवसेनेच्या दुफळीतुन निर्माण झालेल्या सत्ता संघर्षातून शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. अन या नंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या खेड तालुक्यातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सरकारकडून ताकद देण्यास सुरुवात झाली. या सर्व घडामोडीच्यानंतर बऱ्याच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका धरला. यातून खेड तालुक्यातील जे मूळ शिवसेनेशी प्रामाणिक असणारे स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांचेही कुटूंब मागे राहिले नसल्याचे दिसून आले आहे. गोरे कुटूंबाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अगोदर पासूनच कौटुंबिक घनिष्ठ संबंध असल्याचे सर्व खेड तालुक्याने पाहिले आहे. याच संधीचा फायदा घेऊन शिंदे गटाकडून गोरे कुटूंबाला स्वतःच्या गोटात घेऊन खेड तालुक्यात बेरजेची राजकीय समीकरणे जुळविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गोरे कुटूंबाच्या शिंदे गट प्रवेशाच्यानंतर मूळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मनात गोरे कुटूंबा बद्दल मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाल्याचे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे.
यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांची मते घेतली असता, ज्यांची स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांच्यानंतर कुठे तालुक्यात ओळख नव्हती त्यांची ओळख आम्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहचविण्याचं काम प्रामाणिक शिवसैनिक यांनी केले आहे. कुणाला कुठे जायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण जो विश्वास स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांनी जनतेच्या मनात निर्माण केला होता तो विश्वास त्यांच्या कुटूंबातील सदस्य यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ते गमावून बसतील हे त्यांना पुढील काही दिवसातच दिसून येईल. शिंदे गटातील गोरे कुटूंबाच्या प्रवेशाने नक्कीच त्यांची राजकीय आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही अशी उद्धिणं प्रतिक्रिया मूळ शिवसेनेच्या नेत्याकडून व कार्यकर्त्यांकडून येऊ लागली आहे. त्यामुळे येत्या १७ फेब्रुवारीला होणाऱ्या गोरे कुटूंबाचा शिंदे गटातील प्रवेश तालुक्यातील जनतेला किती पचणी पडेल हेच पुढील काही दिवसात समोर आल्या शिवाय राहणार नाही. तो पर्यंत सर्वच खेड तालुका वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे पहावयास मिळत आहे.