राजकीय : खेड तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटातून जनसेवक श्रीनाथ लांडे यांची जोरदार तयारी; गावाची एकजूट..!
News15 मराठी प्रतिनिधी : आशिष ढगे पाटील
शेलपिंपळगाव: खेड तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटातून जनसेवक म्हणून ओळख असलेले आणि स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांचा राजकीय सहवास लाभलेले श्रीनाथ लांडे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
श्रीनाथ लांडे यांनी मागील नऊ वर्षांपासून सातत्यपूर्ण सामाजिक काम करून गोरगरीबांची सेवा केली आहे. त्यांची ही सेवा अजूनही सुरूच आहे. त्यातच जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्याने हीच संधी ओळखून जनसेवकांनी गावगाठीभेटी घेणे, शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, असे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू ठेवले आहेत. त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत शासकीय योजना पोहोचवून नागरिकांना एक कौटुंबिक आधार व समाधान दिले आहे. त्यामुळे श्रीनाथ लांडे यांची ओळख जनसेवक म्हणून तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यातच ते खेड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणाऱ्या शेलपिंपळगावातून येत असल्याने त्यांना मोठे मतदान होण्यास मदत होईल.
श्रीनाथ लांडे यांचे मोठ्या प्रमाणात कार्य उभे असल्याने ते लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी मोठा जनसंपर्क व कामाचा डोंगर उभा केला आहे. याच कारणामुळे या गटात त्यांच्या उमेदवारीसाठी व विजयासाठी नागरिकांमधून सुप्त लाट निर्माण झाली आहे. महिला भगिनींनी तर 'आमचा दादा श्रीनाथ दादा' असा नारा देऊन त्यांच्यासाठी जीवाचे रान करण्याची ग्वाही दिली आहे.
श्रीनाथ लांडे यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांकडून वाढता प्रतिसाद बघता, शनिवारी रात्री आठ वाजता शेलपिंपळगाव येथील हनुमान मंदिरात भव्य बैठक आयोजित केली होती. यामध्ये जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींनी श्रीनाथ लांडे यांना उमेदवारी मिळावी आणि त्यांना निवडून द्यावे, अशी आग्रही मागणी केली. या बैठकीत अनेक जण आणि महिला भगिनींनी सांगितले की, "दादा, तुम्ही लढण्याची भूमिका घ्या, तुम्हाला कसलीच अडचण येऊ देणार नाही. तुम्ही आमच्यासाठी काम केले आहे, तुमचा या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजय होईल," असा विश्वास बैठकीत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी श्रीनाथ लांडे यांना निवडणूक लढविण्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्याची भूमिका घेतली. शेवटी श्रीनाथ लांडे यांनी भाषणातून स्पष्ट केले की, मी जनतेच्या जीवावर या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि कोणावरही टीका न करता निवडणूक लढवणार आहे. श्रीनाथ लांडे यांच्यासाठी गावातील ग्रामस्थ एकवटल्याचे स्पष्टपणे दिसून आले. श्रीनाथ लांडे यांना मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद बघता, त्या गटातील इच्छुक उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.