अंधश्रद्धेमुळे काही लोकांची दुकाने बंद होणार.! अंधश्रद्धा कायदा हिंदूंच्या विरोधात नाही. - प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

अंधश्रद्धेमुळे काही लोकांची दुकाने बंद होणार.! अंधश्रद्धा कायदा हिंदूंच्या विरोधात नाही. - प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

NEWS15 प्रतिनिधी - गणेश मोरे

पुणे : मागील काही महिन्यांपासून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरून राज्याचे वातावरण चांगलच तापलं असून, यावर आता वाद/विवाद आणि राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. नुकतच माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य करत; आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले जयंत पाटील.!

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अतिशय विचारपूर्वक व बराच अभ्यास करून विधिमंडळात पारीत करण्यात आला. त्यावेळी सगळ्यांचाच विचार करण्यात आला होता. त्यामुळे अंधश्रद्धा कायदा हिंदू विरोधात आहे असे म्हणणे योग्य नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली.

अंधश्रद्धेमुळे काही लोकांची दुकाने बंद होणार असतील, तर मला वाटत नाही की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्दच करावा, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. अंधश्रद्धा कायदा हिंदूंच्या विरोधात नाही. तो सर्व धर्मात असलेल्या अंधश्रद्धांच्या विरोधात आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.