धक्कादायक.! प्राचार्यांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला धमक्या आणि अत्याचार.! पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...

धक्कादायक.! प्राचार्यांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला धमक्या आणि अत्याचार.! पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...

NEWS15 प्रतिनिधी : मुंबई

राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, नवजात शिशूसह वयोवृद्ध महिला देखील यात सुरक्षित नसल्याचे चित्र मागील काही घटनांवरून दिसून येत आहे. तर आई-वडिलांनंतर सर्वाधिक पवित्र नातं आणि आयुष्याचे गुरु म्हणून ज्यांना आपण संबोधित करतो; ते गुरु/शिष्य नातही आता पवित्र राहिलं नसून, या नात्याला किंबहून या पेशाला देखील काळिमा फासणार्‍या घटना घडू लागल्या आहेत.

अशीच एक घटना देशातील सुरक्षित शहर अशी ओळख असणार्‍या भागातून समोर आली असून, या घटनेने राज्यसह शिक्षकी पेशाला काळिमा फासली आहे. मुंबईत एका नराधम प्राचार्यांकडून, अल्पवयीन विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलवून बलात्कार केल्याची घटना उघडकील आली आहे. सदर घटना मुंबईतील नागपाडा भागात उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी IPC आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा प्राचार्य फरार झाला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला मुख्याध्यापक त्याच्या कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी मागील अनेक महिन्यांपासून अश्लील चाळे करत होता. असे पीडितेने तक्रारीत नमुद केले आहे. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरत असल्याची माहिती घरातल्यांना सांगण्याची धमकी मुख्यध्यापक देत असे. दरम्यान, प्राचार्याच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने संबंधित प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर हा धक्कादायकप्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्यध्यापक अजुंम खान (५५) विरोधात कलम 376(2)एफ, 376(3), 354,506 भादवि सह कलम 4,8,12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1617409370991755266?s=20&t=5PPDCuJnoMuv5MsajNQDtw