BIG BREAKING :खेड तालुक्यातील सावरदरी गावात दुहेरी खुणाने खळबळ, आबलेच्या नादात खून झाल्याची शक्यता...?
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : औद्योगिक परिसरातील सावरदरी गावात दोन व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्वप्नाली सूरज चव्हाण (वय -२९) रा. सावरदरी, मूळ गाव -किरोली पठार, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सावरदरी गावच्या हद्दीत भक्ती अपार्टमेंट, मंगल शेटे यांच्या इमारती समोर आरोपी प्रदिप दिलीप भगत, रा. सावरदरी, मूळ गाव-वाशीम हा फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या एका गुड्डी(बदलेले नाव) नामक महिलेची छेड काढून तिला वारंवार त्रास देत होता. तसेच गुड्डी राहत असलेल्या घराच्या बाथरूमची खिडकीची काच फोडल्याच्या कारणाने फिर्यादीचे पती मयत सुरज नंदकुमार चव्हाण (वय -२७) व त्याचा मित्र मयत अनिकेत किसन पवार (वय-२४) दोघे आरोपीस जाब विचारण्यासाठी गेले असता. आरोपी प्रदिप भगत याने त्यांच्यावर धार -धार शश्राने वार करून गंभीर जखमी केले. त्यांना तात्काळ स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी तळेगाव येथील पवना हॉस्पिटल तर एकाला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. फरार आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
सध्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बाहेरील कामगार कामासाठी मोठ्या प्रमाणावर आल्याने अशा गंभीर घटना समोर येत आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या भाड्याच्या रूममध्ये त्यांना ठेवताना त्यांची कागदपत्रे व पोलीस ठाण्यातून चारित्र पडताळणी करून घ्यावी. ज्यामुळे अशा घटनाना व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पोलिसांना चाप बसविण्यास मदत होईल. वरील खून हा आबलेच्या नादात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खून झालेल्या घटनास्थळला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परी मंडळ -१ मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभागाच्या प्रेरणा कट्टे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे हे करत आहेत.