कान्हेवाडी बुद्रुक मध्ये किरकोळ वादातुन आकाश करवंदे नामक व्यक्तीने घरापुढील मोटारसायकल गाडी जाळली....!

कान्हेवाडी बुद्रुक मध्ये किरकोळ वादातुन आकाश करवंदे नामक व्यक्तीने घरापुढील मोटारसायकल गाडी जाळली....!

News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड

खेड (राजगुरूनगर): किरकोळ वादाचा मनात राग धरून खेड तालुक्यातील कान्हेवाडी बुद्रुक येथील सोमनाथ सखाराम कोंबल यांची घरापुढे उभी असलेली मोटार सायकल आकाश शांताराम करवंदे व त्याच्या दोन अनोळखी साथीदार यांनी जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जून २०२१ मध्ये कान्हेवाडी बुद्रुक गावातील सोमनाथ सखाराम कोंबल वय २६ वर्षे, धंदा - बांधकाम व्यवसाय यांच्यात व आरोपी आकाश शांताराम करवंदे रा. कान्हेवाडी बुद्रुक ता. खेड, जि. पुणे यांच्यात किरकोळ भांडणे झाली होती. त्याच भांडणाचा मनात राग धरून २१ जानेवारी २०२३ रोजी रात्री २ वाजता आकाश करवंदे व त्याचे दोन साथीदार यांनी सोमनाथ कोंबल यांच्या घरी जाऊन घराचा दरवाजा वाजवून दरवाजा उघडण्यासाठी बोलू लागले. त्यावेळी सोमनाथ कोंबल यांनी आता खूप रात्र झाली आहे काय आहे ते सकाळी बघू म्हणाले असता. आरोपी आकाश करवंदे याने आज तुझी गाडीच पेटवून देतो असे म्हणाला. त्याने सोमनाथ कोंबल यांच्या घराची कडी लावून घरासमोर लावलेली होंडा कंपनीची शाईन एम एच १४ डी. झेड ७९४१ गाडी घरा समोरून घेऊन जाऊन घरा जवळच असलेल्या वडाच्या झाडाखाली नेवून गाडीवर पेट्रोल ओतून पेटवून दिली.

त्यानंतर पुन्हा सोमनाथ कोंबल यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या कुटूंबाला आकाश करवंदे व त्याच्या दोन साथीदारांनी मोठमोठ्याने शिवीगाळ केली. आरोपी आकाश ने आता तर मोटारसायकल जाळली परत आमच्या नादी लागला तर तुम्हाला जाळून टाकेल. तसेच तुझा भाऊ मंगेशचे पण जास्त झाले आहे त्यालाही संपून टाकेल अशी दिली. या सर्व घटने बाबत आरोपी आकाश सखाराम करवंदे व त्याचे दोन साथीदार यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ४३५, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रहातेकर करत आहे.