अड्याळ पोलिसांचा धडाकेबाज कारनामा.! सिलेंडर चोरीचा पर्दाफाश - चार चोरटे गजाआड...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सिलेंडर चोरीच्या घटनांचा अखेर अड्याळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार आरोपींना गजाआड करत चोरलेला माल जप्त केला आहे.
घटनेत फिर्यादी अमित बाबुराव बारापात्रे (वय 39, रा. कोष्टी मोहल्ला, अड्याळ) यांच्या घराच्या पोर्चमधून भारत गॅसचा सिलेंडर चोरीला गेला होता. मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी क्षणार्धात सिलेंडर उचलून नेला. त्याचप्रमाणे कुलदीप उराडे व रुषी कुंभारे यांच्या घरांमधूनही गॅस सिलेंडर गायब झाले होते. एकूण सहा हजार रुपयांचा माल चोरीला गेला होता.
अड्याळ पोलिसांनी कसून तपास करून छगन माधव बारापात्रे (29), गोपाल गणेश कुर्जेकर (32), रोशन नारायण मुंडले (31) व विनोद अशोक रेवतकर (अड्याळ) या आरोपींवर गुन्हा दाखल केला. यातील विनोद रेवतकर हा जखमी असून पुढील तपास पोलीस हवालदार दौलत मारबते करीत आहेत.
पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांत संतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, अड्याळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.!