चाकण औद्योगिक वसाहतीतील एका सरपंचाचा उच्छाद, गुन्हा दाखल होताच सरपंच फरार..!

चाकण औद्योगिक वसाहतीतील एका सरपंचाचा उच्छाद, गुन्हा दाखल होताच सरपंच फरार..!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : औद्योगिक वसाहतीमधील एका सरपंच याने पूर्ण हद्दच केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. जेआर असे गाव सांभाळनारे सरपंच जर असा उच्छाद व दहशद माजवत असतील तर अशा सरपंचाला पदावर राहायचा खरच नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, १३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास वासुली गावच्या हद्दीत वासुली फाटा येथील हॉटेल दोस्ती समोर आंबेठाण रोडच्या कडेला फिर्यादी प्रमोद पोपट राळे यांचे आणि चेतन येवले यांच्यात पूर्वीपासूनच पैशाच्या व्यवहारच्या कारणावरून फिर्यादीचा मालकीचा ट्रॅक्टर जबरदस्तीने चेतन येवले घेऊन गेला. ट्रॅक्टर घेऊन गेल्यानंतर तो ट्रॅक्टर देण्यास नकार देत असल्याने त्यांच्या विरोधी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जात असताना. फिर्यादी प्रमोद पोपट राळे यांच्या ओळखीचे १) सागर जावळे, २) रुतीक बोराडे व ३) त्यांच्या बरोबर अजून एकूण चार साथीदार ज्यांचे नाव पत्ता माहीत नाहीत अशा व्यक्तींनी मला टाटा नेक्सोन गाडीतून येऊन फिर्यादीला गाडी आडवी लावून सागर जावळे याने तुझा व चेतन येवले यांचा काय विषय आहे असे म्हणून मला दमदाटी केली.

त्यानंतर फिर्यादीने सागर जावळे यांना तुम्ही मध्ये पडू नका मी कम्प्लेंट करायला पोलिस ठाण्यात चाललो आहे असे म्हणताच वरील सर्व मिळून सहा व्यक्तींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्यांनी खाली पाडून मारहाण केली. ज्या ठिकाणी फिर्यादीला मारहाण सुरू होती त्याठिकाणी लोकांची गर्दी जमली असता आरोपी सागर जावळे याने आमच्या भांडणात कोणी यायचे नाही, असे सांगून दहशद केल्यामुळे फिर्यादीला कुणी सोडविण्यास आले नाही.

फिर्यादीला सहा आरोपीपैकी एका कोणत्या तरी आरोपीकडून लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या हातपायावर पाठीवर गंभीर मारहाण केली. फिर्यादीला आरोपी मारहाण करत असताना त्या ठिकाणी मुळ वाद असलेला चेतन येवले हा त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची गाडी घेऊन आला. त्याने देखील फिर्यादीला बघून याला खूप माज आला आहे याला आज सोडायचे नाही असे बोलून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या माराहाणी प्रकरणी मुजोर सरपंचासह एकूण ७ व्यक्तीच्या विरोधात भा.द.वि. १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ३४१, ५०४, ५०६ सह क्रीमी लॉ. अमेटमेंट चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून त्यांचा महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस तपास करत आहेत.

या प्रकरणाचा सखोल तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी व त्यांचे सहकारी करत आहेत.