उमरखेड शहर बनले बिहारी राज? नशेच्या आहारी जाऊन मारहाण आणि दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातील लुटले सोने...

उमरखेड शहर बनले बिहारी राज? नशेच्या आहारी जाऊन मारहाण आणि दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातील लुटले सोने...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात मागील कित्येक दिवसापासून काही युवक शहरात अनेक ठिकाणी निर्जलस्थळीं नशेली पदार्थ घेऊन जागोजागी बसत असताना दिसत असून, पोलिसांचे याकडे मात्र साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. असाच प्रकार दि. 30 मे 2024 रोजी दुपारी साडेचार वाजता भर दिवसा उमरखेड ते महागाव रोडवर असलेल्या हॉटेल स्वाद समोर घडला असून, नशेत असलेल्या युवकांनी पान टपरीवर भांडण करून मारहाण करत असताना; पान टपरीतील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याने त्या भावानी फोन करून आपल्या बहिणीला आपल्याला काही युवक मारहाण करीत आहेत तुम्ही मला वाचवा असे सांगितले असता; दोन बहिणी व भाऊजी त्याला वाचवण्याकरिता आले असता; त्या युवकांनी सुशिक्षित व नोकरीवर असलेल्या कुटुंबाला मारहाण करीत गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले असल्याची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनला दिली. 

तरीही पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता तब्बल बरीच तास उलटून गेल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.उमरखेड शहर हे बिहार बनल्यासारखे दिसत आहे‌. बराच वेळ भांडण चालू होती काही वेळानंतर त्या महिलेने आपल्या बहिणीला आरोपी मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ काढला. तो  मारहाणीचा व्हिडिओही News15 मराठी वाहिनीच्या हाती लागला आहे. त्यामुळे उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरखेड तालुक्यात मागील काही दिवसापासून वाळू माफिया, गुटखा माफिया, अवैध दारू विक्रेते तसेच नशेली पदार्थ विक्रेत्यांनी रान वाजवले असून यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या कारवाया होत नसताना अशा या अवैध पद्धतीने विकणाऱ्यावर  पोलिसांनी तात्काळ आवर न घातल्यास व कडक कारवाई न केल्यास शहराची परिस्थिती बिघडू शकते असे सदर सुशिक्षित कुटुंबाने उमरखेड ठाणेदारांना बोलून दाखवले आहे, त्यावर ठाणेदारांनी मारहाण करणाऱ्या या आरोपीवर कलम 394, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार सोळंके करीत आहे.