तोंडार पाटी साखर कारखान्या जवळ महिलेची कोयत्याने वार करून हत्या...

तोंडार पाटी साखर कारखान्या जवळ महिलेची कोयत्याने वार करून हत्या...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी विलास सहकारी साखर कारखाना युनिट २ हंगरगा रोडवर असलेल्या; विटांच्या घरामध्ये सखुबाई तुळशीराम वाघमारे वय ६५ वर्ष या महिलेच्या गळ्यावर कोयत्याने वार करून, खून केल्याची घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच.! उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसे, नाना शिंदे, राजू घोरपडे, तिडोळे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून कोयता जप्त करण्यात आला व श्वान पथकास पचारण करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमागील मारेकऱ्यांचा तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.