केम मधील बाळू तळेकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल...
![केम मधील बाळू तळेकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल...](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_645b837f0836b.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे
सोलापूर / करमाळा : करमाळा तालुक्यातील केम गावातील बाळु तळेकर यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तळेकर यांना अद्यापर्यंत अटक केली नसली तरी; चौकशी सुरु केली आहे. या बाबत रुपेश नागनाथ गायकवाड (वय 21 रा. उपळवाटे ता. माढा जि.सोलापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळु तळेकर ( रा.केम ता.करमाळा जि.सोलापूर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रुपेश गायकवाड यांचा आरोप असा आहे की.! बाळू तळेकर हे ॲट्रॉसिटी कायद्याला कोणत्याही प्रकारे जुमानत नाहीत. रुपेश गायकवाड हे मीत्रा सोबत केम येथे आठवडी बाजारासाठी गेले असता; बाळु तळेकर यांना भाजी विक्रीची केलेली उधारीमुळे बाळु तळेकर यांना राग आल त्यांनी पाटीमागील वाद उकरून काढला त्यांच्या बोलण्यात असे आले की तुझा भाऊ शुभम गायकवाड याने माझ्या मामा चा मुलगा हरीदास खुपसे याच्या वरती अट्रॉसिटी केली त्याच काय फायदा झाल का? आम्ही त्याला सोडवून आनलच ना.! अस बोलुन काही जातीवाचक वक्तव्य करुन व हात पाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दीली. या आरोपा खाली बाळु तळेकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास करमाळा पोलीस प्रशासन करेल.