मोठी बातमी : कुरुळी गावात नवऱ्याने बायकोला दगडाने व चाकूने गंभीर मारहाण..!
![मोठी बातमी : कुरुळी गावात नवऱ्याने बायकोला दगडाने व चाकूने गंभीर मारहाण..!](https://news15marathi.com/uploads/images/202412/image_750x_675d3558dc0a7.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुळी गावातील संतोष गंगाराम कदम याने घरगुती वादातुन बायकोच्या डोक्याला दगडाने व शरीरावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे.
मिळालेल्या माहितीवरून कुरुळी गावातील संतोष गंगाधर कदम व सुलोचना संतोष कदम हे नवरा बायको म्हणून एकत्र राहत होतो. दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी दोघांचे घरगुती कारणातुन जोरदार भांडण झाले त्यातून राग येऊन पती संतोष कदम याने बायकोच्या डोक्यात दगड व शरीरावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. जखमी झालेल्या महिलेवर चाकण येथील खाजगी रुग्णालयात मृत्युंशी झुंज सुरू आहे. आरोपीला गुन्हे शाखा युनिट -३ चे राजकुमार हनुमंते यांनी सीतापीने आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीला घटनेनंतर ताब्यात घेतल्याने युनिट ३ चे कौतुक करण्यात येत आहे.
आरोपीवर पुढील कारवाई करण्याची कार्यवाही महाळुंगे MIDC पोलीस यांच्याकडून सुरू आहे.