पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी खराबवाडीतील एकाला अटक व जामीनावर सुटका...!
![पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी खराबवाडीतील एकाला अटक व जामीनावर सुटका...!](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63d8c7e60fbf8.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील नजीर इनामदार नामक आरोपीने पत्रकाराला बातमी हि बातमी का लावली म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी म्हाळुंगे पोलीसांनी अटक करण्यात आली.
नजीर इनामदार नामक आरोपीने एका वसाहतीची पोर्टलला बातमी केल्याने अशी बातमी तू का केली, तुला बघून घेतो, मी प्रॉपर आहे अशा आशयाची भाषा वापरून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पत्रकार यांच्याकडून आरोपी विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा. द. वि.504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर आरोपीला म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या अगोदरही नजीर इनामदार याच्याबाबत पोलीस ठाण्यात अजूनही तक्रारी असल्याचे समोर आले आहे. जर असे आरोपी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय? असाच काहीसा प्रश्न उपस्थित केला जात आहे.