राज्यात पुरुष वर्गही सुरक्षित नाही? अल्पवयीन विद्यार्थ्याला दारू पाजून, विवाहित महिलेचे अश्लील कृत्य.!
![राज्यात पुरुष वर्गही सुरक्षित नाही? अल्पवयीन विद्यार्थ्याला दारू पाजून, विवाहित महिलेचे अश्लील कृत्य.!](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63d8b3feb021b.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : कल्याण / डोंबिवली
राज्यात महिला आणि मुलींनावर अत्याचार होत असलेल्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांना; यात आता पुरुष वर्गही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. महिलांकडून पुरुषांवरही अत्याचार होत असल्याच्या घटना राज्यात घडू लागल्या आहेत. विशेष: म्हणजे अल्पवयीन मुलं यांचं प्रमाण यात अधिक आहे.
अशीच एक घटना कल्याण येथील कोळशेवाडी परिसरात घडली असून, एका 32 वर्षीय विवाहीत महिलेने 15 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याची ही घटना आहे. तर कीर्ती घायवटे असं या आरोपी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विवाहित महिलेने पीडित मुलाला दारू व अश्लील चित्रपट बघण्याचे व्यसन लावले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात त्या विवाहित महिले विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, कल्याण पूर्वेत पीडीत अल्पवयीन विद्यार्थी कुटूंबासह राहून तो एका इंग्रजी शाळेत 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी महिला ही नाशिकमध्ये राहणाऱ्या पीडित मुलाची आत्याची मानलेली मुलगी असून, तिला दोन मुले आहेत. त्यातच पीडित मुलाची आजी कल्याणात राहत असल्याने, आत्या तिला पाहण्यासाठी ज्यावेळी कल्याणला आली; त्यावेळी तिच्यासोबत आरोपी 32 वर्षांची मानलेली मुलगी कल्याणला पीडित मुलाच्या घरी येत होती. दोघांची ओळख होऊन आरोपी महिला आणि पीडित मुलगा यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर महिला नेहमी त्याला दारू पाजून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती दाखवत शारीरिक संबंध करायची. त्यामुळे मुलगा दारूचे व्यसनासह मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती बघण्याच्या आहारी गेला. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी त्याला भिवंडीच्या सुधागृहात ठेवले. याच दरम्यान सुधागृहामध्ये मुलाने आपल्याबरोबर घडलेली घटना सांगितली. घटनेचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.