BIG BREAKING : खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याचा संशयास्पद मृतदेह आढळला, धक्कादायक घटनेने तालुक्यात खळबळ...!

BIG BREAKING : खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याचा संशयास्पद मृतदेह आढळला, धक्कादायक घटनेने तालुक्यात खळबळ...!

News15 प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

खेड(राजगुरूनगर) : पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंता बी.एम.शिंदे यांचा १४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी बुट्टेवाडी हद्दीतील चासकमान धरणाच्या कालव्याजवळ संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीवरून, पंचायत समिती खेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बी.एम. शिंदे नेहमीप्रमाणे आपल्या स्व:ताच्या गाडीतून कार्यालयात आले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास कुणाला काही न सांगता एका ठेकेदारची दुचाकी घेऊन ते कार्यालयातून बाहेर पडले होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अभियंता शिंदे यांच्या पत्नी व मुलगा पंचायत समिती कार्यालयात येऊन धायमोकलून रडू लागल्याने नक्की काही तरी विपरीत घडले असल्याची चर्चा होऊ लागली. त्यानंतर ही वार्ता वार्‍यासारखी तालुक्यात पसरली आणि तददनंतर सायंकाळी सातच्या सुमारास बुट्टेवाडी येथील कालव्याच्या लगत शिंदे यांचा संशयास्पद मृतदेह मिळून आला.

अभियंता शिंदे यांचा हा अपघात, घातपात की आत्महत्या आहे याचा सखोल तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत. मागील काही दिवसापूर्वी खेड तालुक्यातील विकासकामांच्यात खेड पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. या आरोपांच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांना दोषी धरावे अशी मागणी राजकीय आरोप प्रत्यारोपातून करण्यात आली होती. त्यानंतरच अशी घटना घडल्याने अनेक उलट सुलट प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या विकास कामांत भ्रष्टाचार झाला त्या कामांची बिले मयत अभियंता शिंदे यांनी बिले काढली असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या मृत्यू बद्दल अनेक उलट सुलट तर्क बांधले जात आहेत.

या प्रकरणात आमदार दिलीप मोहिते पाटील व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यातील विकासकामांत झालेला राजकीय कलगितुरा बघता अधिकारी हे राजकीय दबावला बळी पडून असे टोकाचे पाऊल उचलत असल्याचीही चर्चा तालुक्यात चर्चिली जात आहे. रात्री उशिरा संबंधित अधिकार्‍याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिसांच्याकडून सुरू आहे.