‘त्या’ आरोपीला १० वर्षांची कैद...
![‘त्या’ आरोपीला १० वर्षांची कैद...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66a7a85751321.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या अतिप्रसंगाच्या संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यात सदर आरोपीला १० वर्षे कैद व २५ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिंडोरी पोलिस ठाण्यात दि.६ जुलै २०१९ रोजी भा.द.वि.क.३७६,३७६ (२) (१), पोक्सो ४,१२ प्रमाणे आरोपी नामे रेवासिंग उर्फ नानल पिता कैलास बारेल रा. मोरदाड, सेंधवा,ग्रामिण,जिल्हा बडवाणी,मध्यप्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पिडीत मुलगी/फिर्यादी हि तिची बहिण हिच्याकडेस तिचे मुले सांभाळण्यासाठी मध्यप्रदेश येथुन महाराष्ट्र राज्यात आलेली होती. तसेच फिर्यादीची बहिण व आरोपी हे देखील मजुरीसाठी मध्यप्रदेश येथुन महाराष्ट्र राज्यात आलेले होते. यातील पिडीत मुलगी/फिर्यादी हि तिचे मोठे बहिणीचे घरी मुले सांभाळत असतांना; आरोपीने तिस एकटीला पाहुन तिस घरात बळजबरीने घेवून जावुन, पिडीत मुलगी हि अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिचे तोंड दाबुन, तिस घरात नेवुन तिच्यावर अतिप्रसंग केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले यांनी केलेला होता. आरोपीविरूद्ध सबळ पुरावे झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सदर गुन्ह्याची सुनावणी न्यायाधीश कचरे जिल्हा सत्र न्यायालय कं.१ यांच्या न्यायालयात झाली असुन फिर्यादीच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती रेश्मा जाधव यांनी बाजु मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे ऐकुण घेवून साक्षीदार व भौतीक पुरावे तपासुन आरोपीविरूद्ध पुरावा मिळुन आल्याने, न्यायालयाने आरोपी यास भा.द.वि.क ३७६ मध्ये दोषी ठरवून १० वर्षे कारावास व २५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने, भा.द.वि.क ५०६ मध्ये एक महिना शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना शिक्षा सुनावली आहे. सदर सुनावणीचे पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस हवालदार गणेश बाळासाहेब वराडे यांनी काम पाहिले आहे.