घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करून द्या - किशोर तरोने
![घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करून द्या - किशोर तरोने](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66ae4aeccbf38.jpg)
प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया
केंद्र सरकारच्या घरकुल योजना अंतर्गत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणात घरकुल उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजना 2022-23 मध्ये अमलात आणली. सदर योजनेअंतर्गत अर्जुनीमोरगाव तालुकातील एकूण 1345 घरकुल मंजूर झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 1345 घरकुल मंजूर लाभार्थ्यांना पहिला हप्ता उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर आजपर्यंत कुठलीही निधी उपलब्ध झाली नाही.
त्यामुळे नेहमीच गरीब ओबीसी अन्यायाचा प्रवाहात असतो.! त्याचा हा घर बांधकामाचा सुरुवात करून निधी अभावी काम अपुर्ण पडलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील किती तरी ओबीसींच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. जुनं मोडकळीस आलेलं घर पाडून त्या ऐवजी नवीन घराचे बांधकाम सुरू करण्यात आलं व घरकुल योजनेचा निधी रखडल्याने; सदर घरकुल आता अपूर्ण अवस्थेत पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात तालुका स्तरावर लाभार्थी हेलपाड्या घालत असून, सावकाराकडून कर्ज काढून आपले दिवस काढत आहेत. त्यामुळं आज दि. 03 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी जिल्हा अध्यक्ष किशोर तरोणे, तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, अर्जुनी मोरगाव विधानसभा अध्यक्ष योगेश नाकाडे यांच्या उपस्थितीत; राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना निवेदन देऊन; त्वरित निधी उपलब्ध करून जनसामान्य ओबीसी नागरिकांची समस्या दूर करावी असे निवेदनातून विनंती करण्यात आली आहे.