पालखेड बंधारा येथील उज्वला लोंढे हीची; PSI पदाला गवसणी...
![पालखेड बंधारा येथील उज्वला लोंढे हीची; PSI पदाला गवसणी...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66b1b7c009194.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब व मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यात दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रगतिशील शेतकरी तथा व्यवसायिक हिरामण तुकाराम मिठे यांची नात; उज्वला लोंढे ईने यश संपादन केले आहे. तिच्या यशाचे पालखेड ग्रामस्थांनी कौतुक केले.
सामान्य कुटुंबातील असणाऱ्या उज्वलाने याआधीही दोन वेळा परीक्षा दिली होती परंतु तिला अपयश आले होते या अपयशाला न डगमगता तिने पुन्हा जिद्द मेहनत चिकाटी हे तत्व अवलंबवली आणि पुन्हा नव्याने परीक्षा देऊन त्यावर मात करत तिने हे संपादन केले यामध्ये पती रोहित लोंढे सासरे लक्ष्मण लोंढे सासुबाई ज्ञानेश्वरी लोंढे यांनी तर आजोबा हिरामण मिठे यांनी दिला वेळोवेळी मदत केली.
लहानपणापासूनच हुशार असणाऱ्या उज्वलाने याआधीही सन २०१६ पासून सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षे प्रवास यादरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा एसटीआय मुख्य परीक्षा च्या दोन वेळा मुख्य परीक्षा २०१८,२०१९ तसेच महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा २०२१ मध्येही थोड्या मार्कांनी हुलकावणी दिली.कुठल्याही क्लासचा आधार न घेता मात्र त्यानंतर २०२२ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.त्यामुळे उज्वला लोंढेचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.