हिंगोलीतील कळमनुरी शहरात स्वच्छतेचे तीनतेरा.! सर्वत्र घाणीचे साम्राज्य...

हिंगोलीतील कळमनुरी शहरात स्वच्छतेचे तीनतेरा.! सर्वत्र घाणीचे साम्राज्य...

News15 मराठी प्रतिनिधी : नारायण काळे

हिंगोली : कळमनुरी शहरात स्वच्छतेचे तीनतेरा झाले असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील चौकाचौकात स्वच्छतेचा बोजबारा उडाल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिग पाहवयास  मिळत आहेत. स्वच्छ शहर सुंदर शहर हि संकल्पना जाहिरात पुरतीच सिमित असून, नगरपालीकेचे याकडे दुर्लक्ष झालय.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ कागदावरच असल्याचे दिसते कळमनुरी शहराची भौगोलिकस्थिती पाहता साधारणता तीन ते चार किलो मिटरचे क्षेत्र आहे. नगरपालिकेचे १० प्रभाग असुन १७ नगरसेवक आहेत नवीनवस्ती काँलनी भाग झपाट्याने वाढत आहेत. नगरपालिकेतर्फे शहर स्वच्छतेचा ठेका दिला आहे. तरीपण शहरातील नाल्या तुडुब भरलेल्या असुन ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग, प्लॅस्टिक, सांडपाण्याचे डबके, कोबड्या, बक-याच्या मांसाचे तुकडे छाटलेलेपंख गटारीतील काढलेली घाण भररस्त्यावर जागोजागी पडलेली आहे.

नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यास पालिका प्रशासनाची मानसिकता दिसून येत नाही तसेच नाल्यात कँरीबँगचा खच पडलेला आहे. गटारी तुडुंब भरलेल्या असुन नालेसफाई होताना दिसत नाही यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. अजूनही प्रशासनाचे डोळे उघडणार कि नाही? हाच मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.