महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणी बरोबर मोफत शस्त्रक्रिया देखील केल्या जातील : डॉ. भारती पवार
![महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणी बरोबर मोफत शस्त्रक्रिया देखील केल्या जातील : डॉ. भारती पवार](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65cb524f47a3b.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
ग्रामीण रूग्णालय दिंडोरी येथे आयोजित वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते पार पडले.
डॉ. भारती पवार यांनी बोलतांना सांगितले की, आता केंद्र सरकारने देखील राज्यांना सूचना केले आहेत की जिथे जिथे शक्य आहे तिथे तात्काळ तुम्ही कॅम्प आयोजित करा. स्क्रीनिंग करा ज्यांना गरज आहे. त्यांचे ऑपरेशन्स करून घ्या. अंधत्वाचं प्रमाण वाढू नये म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत राज्य सरकार देखील वेगवेगळ्या ठिकाणी हे कॅम्पस आयोजित करत आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय पीएमसी,डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल वेगवेगळ्या ठिकाणी ही पेशंटला स्क्रीनिंग करून जिथे गरज आहे तिथे पेशंटला तात्काळ मदत केली जाते कॅटरॅक सर्जरी फ्री व्हावी म्हणून सरकारने पूर्णपणे अनुदान दिलेल आहे माझी एवढीच विनंती आहे की आपण सुद्धा याचा जनजागर करा ज्यांना अडचणी असतील त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधा असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव श्याम मुरकुटे, श्याम बोडके, रणजित देशमुख, योगेश बर्डे, सुनील पवार, अमर राजे, दीपक जाधव, अरुणाताई देशमुख, नरेंद्र जाधव, महेंद्र पारख, तुषार वाघमारे, डॉ राजेंद्र वराडे,वसंत कावळे, किशोर ढगे, मित्रानंद जाधव, अमोल खोडे, कुंदन जावरे, निलेश खोडे, मयूर जैन तसेच प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.समीर काळे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे, डॉ अनंत पवार आदींसह भाजपाचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.