पाटणबोरी पत्रकार संघटना कार्यकारणी निवड.! अध्यक्ष पदी निलेश यमसनवार यांची निवड...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी (यवतमाळ)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15 ऑगस्ट 2025 ला पाटणबोरी पत्रकार संघटनेची बैठक झाली.श्री. कालिका माता सभागृहात बैठक संपन्न झाली.त्यामध्ये नवीन कार्यकारणी एकमताने गठित करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्ष पदी लोकमचे प्रतिनिधी निलेश यमसनवार यांची एक मताने निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी संदीप दीपक सुरपाम,सचिवपदी नंदकुमार अर्गुलवार,कोषध्यक्षपदी मोबीन तिघाले, कार्यकारणी सदस्य सल्लागारपदी गणेश अग्रवाल, ओंकार डब्बावार, अनिल पुल्लोजवार, शेखर सिडाम, संतोष नक्षणे,मोहन एनगूर्तीवार, रामेश्वर पुदरवार, गजानन कैलासवार, प्रशांत लसंते, गोपाल महाराज शर्मा, संतोष क्षीरसागर, विनोद निमलवार, हणमंतू सुरावार आदींची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.