BIG BREAKING : खराबवाडी गावात एका कंपनी मालकाने वनविभागाच्या जागेतील तार कंपाउंड व वनिकरण फलक तोडून बेकायदेशीर रस्ता केला...!

BIG BREAKING : खराबवाडी गावात एका कंपनी मालकाने वनविभागाच्या जागेतील तार कंपाउंड व वनिकरण फलक तोडून बेकायदेशीर रस्ता केला...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील गट नंबर २५२ मधील क्षेत्र ०१/०१ आर(एक हेक्टर) क्षेत्र वन विभागाचे असून त्यावर त्या संपूर्ण क्षेत्राला संरक्षणार्थ वन विभागाकडून चाकण - तळेगाव रस्त्याच्या लगत तार कंपाउंड व वनिकरण मालकीचा फलक मागील काही दिवसापूर्वी लावण्यात आला होता.

वन विभागाने त्यांच्या क्षेत्राला तार कंपाउंड केल्याने कंपाउंडच्या आतील बाजूस असलेल्या श्री ईस्ट इंडिया स्ट्रिल कंपनीचा पूर्णतः रस्ता बंद करण्यात आला होता. त्या कंपनीच्या मालकीची जागा नसल्याने वन विभागाने नियमानुसार त्यावर पूर्णतः तार कंपाउंड केले होते.

पण श्री ईस्ट स्ट्रिल इंडिया कंपनीने वन विभागाची कोणतीही परवानगी नसतानाही थेट वन विभागाने केलेले तार कंपाउंड व वन विभागाच्या मालकीची जागा असणारे फलक तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे वन विभागाच्या मालकीची जागा असूनही ही मुजोर कंपनी अशा मनमानी पद्धतीने वागत असेल अन त्यावर वन विभाग जर बघ्याची भूमिका घेत असेल तर कुठे तरी चाकण वन विभाग अधिकारी महाजन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

यावर खराबवाडी क्षेत्राच्या वनरक्षक रावते यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, मला काही माहिती नाही मलाही माहिती घ्यावी लागेल अशी बतावणी त्यांनी केली. यावरून कुठे तरी चाकण वन विभागात कुंपणच शेत खात असल्याचे समोर आले आहे. वन विभागाने कंपाउंड घातल्या नंतर तिथे वन विभागाच्या मालकीची जागा असल्याचे फलक लावले असतानाही मुजोर कंपनी मालक असे उपद्याप करत असतील तर कंपनी मालक किती मुजोर झाले हे यावरून दिसून येत आहे.

तर चाकण वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेत असतील तर कुठे तरी दाल मे कुच काला है अशीच काहीशी शंका विभागावर स्थानिक ग्रामस्थ घेत आहे. या प्रकरणातील दोषी कंपनीवर व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मुख्य वनसंरक्षक यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.