शाम बोडके यांच्या दिनदर्शिकेचे नामदार झिरवाळ यांच्या हस्ते प्रकाशन

शाम बोडके यांच्या दिनदर्शिकेचे नामदार झिरवाळ यांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,क्रांतिवीर व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक,दिंडोरी पंचायत समिती माजी सदस्य शाम बोडके यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रकाशन सोहळा प्रसंगी नामदार नरहरी झिरवाळ,जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे,भाजपा नेते नरेंद्र जाधव,रमेश बोरस्ते,शरद बोडके,गणपत बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार झिरवाळ यांनी बोलताना सांगितले की शामभाऊ बोडके व जिल्हा परिषद माजी सदस्या सौ.मनीषाताई बोडके यांचे सामाजिक काम मोठे असून तालुक्यातील जनतेच्या सुखदुखात बोडके कुटुंब सहभागी होत असते.उमराळे बु गटातील प्रत्येक गावांत त्यांचा जनसंपर्क मोठा असून दिनदर्शिकेचा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्यात ते राबवत असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.

शाम बोडके यांनी दिनदर्शिका प्रकाशन व तालुक्यात केलेल्या कामकाजाची माहिती दिली.