वलखेड येथे अज्ञातांकडून स्मशानभूमीवर अघोरी पूजा विधि...

वलखेड येथे अज्ञातांकडून स्मशानभूमीवर अघोरी पूजा विधि...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

 

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे स्मशानभूमी मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातंकडून अघोरी अनुचित पूजा विधी प्रकार करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

येथील स्मशानभूमी मध्ये रात्रीच्या वेळेस अशा काही पूजा विधी केल्या जातात. या अगोदरही असे प्रकार येथे झालेले आहेत. येथे काळ्या फडक्यात बांधलेल्या टोपल्यामध्ये काळी बाहुली व इतरही बाहुल्या, टाचण्या, लिंबू, कवड्या, हळदीकुंकू अजूनही इतर साहित्य असे एका लाल दोरीने काळ्या फडक्यात बांधून येथे मध्यरात्री पूजा विधी केलेली दिसून आली. जग इतके पुढे जात असताना असे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून असे काही अनुचित प्रकार या ठिकाणी केले गेले याबद्दल येथील सरपंच विनायक शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला व असे कृत्य करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

काही व्यक्तींनी सांगितले की एक ट्रिपल सीट मोटरसायकल रात्रीच्या वेळेस स्मशानभूमीकडे गेली होती पण असेल काही कुणीतरी म्हणून चौकशी केली नाही पण तेच तिघेजण पूजाविधी करणारे असावेत असा संशय येत आहे परिसरातील सीसीटीव्ही चेक करून तपास करणार आहोत असे कृत्य कोणीही करू नये सापडल्यास माफ केले जाणार नाही असेही सरपंच विनायक शिंदे  यांनी सांगितले. यावेळी सरपंच विनायक शिंदे, अनंत पाटील, योगेश शिंदे, काशिनाथ गायकवाड, गणेश शिंदे, खंडू पवार, पिंटू जाधव, रोशन साडे आधी ग्रामस्थ हजर होते.