राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज मार्ग फलक अनावरण व भूमीपूजन सोहळा संपन्न...

राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज मार्ग फलक अनावरण व भूमीपूजन सोहळा संपन्न...

 प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील पोलिस औट पोस्ट समोरील जिल्हा परिषद रोड लगत असलेल्या ग्रामपंचायत शासकीय जागेत मासिक सभा व ग्रामसभा ठरावानिशी राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज मार्ग फलक अनावरण व भूमिपूजन सोहळा गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ.दिपाली सुरावार व उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

त्यानंतर सरपंच सौ.दिपालीताई सुरावार,राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त माजी सरपंच त्र्यंबक नगराळे,मनोज भागानगरकर, माजी भाजपा शहर अध्यक्ष गजानन सिंगेवार,यांनी महाराजान बदल आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर पत्तीवार सर तर आभार प्रदर्शन सचिन पत्रकार यांनी केले.

यावेळी माजी सरपंच यादवराव गादेगोनीवार,माजी सरपंच विनोद निम्मलवार,माजी उपसरपंच अनिल पुल्लोजवार,माजी भाजपा तालुका अध्यक्षा सुगनाताई कोरीवार,काँग्रेस शहर अध्यक्ष सुरेश शर्मा, मा.ग्रा.पं.सदस्य गजानन राजुलवार,सुभाष चांदेकर,गजानन पानाजवार,लखन मेश्राम,

अतुल कनाके,सत्यविजय करमलकर, अशोक रोडावार तसेच सर्व धोबी समाज बांधव व परिसरातील गाडगे महाराज अनुयायी प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज मार्ग फलक अनावरण आणि भूमिपूजन माझ्या हस्ते होणे माझे भाग्य समजतो सरपंच सौ.दिपालीताई सुरावार.