दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये समाजदिन उत्साहात साजरा

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये समाजदिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी - बापू चव्हाण - नाशिक

जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी समाज ध्वजाचे ध्वजारोहण जेष्ठ नेते चंद्रकांत राजे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवा चे माजी संचालक शिवाजी भाऊ जाधव होते. यावेळी माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे उच्च माध्यमिक स्कुल कमिटी अध्यक्ष दत्तात्रय जाधव ,अभिनव बालविकास समितीचे दौलत दादा उखर्डे,आदर्श इंग्लिश मिडीयम समितीचे ऍड प्रदीप घोरपडे जेष्ठ,उपनगराध्यक्ष शैला उफाडे, शालेय समितीचे गुलाब तात्या जाधव,सुभाष बोरस्ते कैलास मवाळ ,माजी सैनिक संघटना अध्यक्ष भारत खांदवे,आर के खांदवे,बंडू भाऊ भेरे,मनोज ढिकले,रणजित देशमुख,दत्तात्रय नाईकवाडे,रामदास कदम,साहेबराव घोलप,वाळू जगताप,अशोक नाठे,प्राचार्य शरद शेजवळ डीएड कॉलेज प्राचार्य डॉ संजय काळोगे,इंग्लिश मिडीयम स्कुल प्राचार्य सौ निर्मला जाधव,मविप्र सेवक सोसायटी चिटणीस बाबा मोरे,उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक श्रीमती प्रतिभा मापारी,श्रीमती सविता शिंदे,रावसाहेब उशीर  ,कॉलेज विभाग प्रमुख उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत एनसीसी पथक,बँड पथकाने संचलन करून केले. राष्ट्रगीत व समाज गीत सादरीकरण विद्यालयाचा गीत मंच यांनी केले.उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.या दिनानिमित्त विद्यालयात रांगोळी प्रदर्शन, पुष्परचना प्रदर्शन व इको फ्रेंडली राखी प्रदर्शन ठेवण्यात आले. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणातील वृक्षांना इको फ्रेंडली राख्या बांधल्या व पर्यावरणाप्रती आपल्या भावना या राख्यांतून व्यक्त केल्या  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले." बहुजनांच्या उद्धारासाठी विचारवंतांच्या विचारधारेने प्रभावित होऊन कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी शिक्षण परिषदा घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज संस्था स्थापनेची संकल्पना पुढे आणली. 1914 साली उदाजी बोर्डिंग च्या रूपाने संस्थेचे रोपटे लावले पुढे या विद्या प्रवाहात त्यांना जे जे कर्मवीर भेटले त्या सर्व कर्मवीरांनी तन मनधनाने या रोपट्यास विचारांचे व कर्तृत्वाचे पाणी घातले आज त्याचा महावृक्ष तयार झालाआहे ज्याच्या फांद्या फांद्यांवर तुम्ही आपण सर्व बागडत आहोत सर्वांचे संसार, जीवन फुलत आहे याचे सर्व श्रेय कर्मवीरांच्या कार्याला जाते. भविष्याच्या वाटा आज भयावह वाटतात पण यातही आपल्याला टिकून राहायचे आहे शिस्त  गुणवत्ता व पारदर्शकता दूरदृष्टीकोन या चतुःसूत्रीच्या बळावर मूल्यांचा अंगीकार करून शिक्षणाच्या वाटेने पुढे चालवायचे आहे."असे बहुमोल मार्गदर्शन केले. शिक्षक मनोगतात पी एस सोनवणे व विद्यार्थी मनोगत कुमारी श्रुती कोराळे हिने केले.    परिसरातील अनेक मान्यवरांच्या स्मृती प्रित्यर्थ दिली जाणारी रोख रक्कम व त्यावरील व्याज अशा पद्धतीचे रोख बक्षीस देऊन इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

जेष्ठ नेते चंद्रकांत राजे यांनी मनोगत व्यक्त केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले कर्मवीरांच्या विचारास व त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा करत स्पर्धेच्या युगात टिकून राहावे विचारवंत व गुणवंत व्हा व संस्थेच्या यशाकडे पाहण्यापेक्षा पायाकडे पहा व त्यांचा विचारांचा वसा पुढे चालु द्या असे आव्हाहन केले.

सूत्रसंचालन संतोष कथार, श्रीमती नेहा देशमुख श्रीमती सरला कदम यांनी तर आभार प्रा संदीप जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती व सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.