NIA ची महाराष्ट्रासह 5 राज्यात छापेमारी.! अमरावतीतून एकाला अटक
![NIA ची महाराष्ट्रासह 5 राज्यात छापेमारी.! अमरावतीतून एकाला अटक](https://news15marathi.com/uploads/images/202412/image_750x_675a98f5d7bbb.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - अमरावती
राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज देशभरात मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयातून 5 राज्यातील 19 ठिकाणी छापे टाकले आहेत. आज सकाळी आसाम, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील 19 ठिकाणी एनआयने कारवाई केली.
आज सकाळी एनआयएने अमरावतीमधील छायानगरमध्ये छापा मारला. एनआयएने या कारवाईत एकाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा 35 वर्षीय युवक असल्याची माहिती देण्यात आली आहे. या तरुणाचा संबंध पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदशी असल्याचा संशय आहे. एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसकडून या तरुणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी एक छापा भिवंडीतही मारला असल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद शी व्यक्तींच्या अतिरेकी संबंधांच्या प्रकरणाच्या चालू असलेल्या तपासाचा एक भाग आहे.