दिंडोरी नगरपंचायत कार्यालयाचे स्थलांतर...

दिंडोरी नगरपंचायत कार्यालयाचे स्थलांतर...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी नगरपंचायत बाजार पटांगण येथील कार्यालयाचा काही भाग नादुरुस्त असल्याने  नगरपंचायत चे कार्यालय आदिवासी सांस्कृतिक भवन दिंडोरी या ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी यांनी दिली.

सोमवार दिनांक १६  सप्टेंबर २०२४ पासून स्थलांतरित केलेल्या ठिकाणी नगरपंचायतचे कामकाज सुरू होणार असल्याचे नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुनीता लहांगे उपनगराध्यक्षा शैला उपाडे यांनी केले आहे.