सत्यसाई बहुउद्देशीय मंडळ पाटणबोरी यांच्यातर्फे - सत्य साईबाबा जन्मशताब्दी सोहळा...
प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ
पाटणबोरी - येथील सत्यसाई बहुउद्देशीय मंडळ पाटणबोरी यांच्यातर्फे भगवान सत्यसाईबाबा यांचा जन्मशताब्दीचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी सकाळी आठ ते नऊ -ओंकार सुप्रभातम व सहस्त्रनामाली वाचन करण्यात आले.
नऊ ते दहा साई भजन व दहा ते अकरा पूजा ,आरती व विभूती, बारा ते साडेतीन महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला हे यावेळी गावातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी सहा ते साडेसात महा आरती करण्यात आली त्यानंतर प्रसाद व फळ वाटप करण्यात आले आठ ते नऊ रात्री नारायण सेवा अंतर्गत गरजूंना ब्लॅंकेट केळी व पाणी बाटल्या चे वाटप करण्यात आले.
यावेळी सत्यसाई सेवा समितीचे अध्यक्ष नंदकुमार अरगुलवार, सचिव गोपाळराव कैलासवार, भास्कर मालिकर, विजेंद्र डबावार, गजानन भूपतवार, अथर्व पोंक्षे, विनोद शहारे, बावणे सर, अरविंद एनगुरतीवार, मलिकार्जुन डबावार, रत्नाकर उत्तरवार, वामनराव जंगमवार व इतर भक्तगण हजर होते.