वृक्षां संगोपन ही काळाची गरज - श्री. सुर्यवंशी
![वृक्षां संगोपन ही काळाची गरज - श्री. सुर्यवंशी](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_669690161b7b6.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
झाडे लावणे सोपं काम आहे.परंतू त्याचे संगोपन व संवर्धन करणे मोठ्या जिकिरीचे काम आहे.त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवडीत नागरिकांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे.वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्विकारावी,असे आवाहन कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी केले.
दिंडोरी पोलिस ठाणे अंतर्गत मोहाडी दुरक्षेत्र येथील मोकळ्या जागी १०० ते १२५ वृक्ष लागवड कार्यक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. त्याप्रसंगी सुर्यवंशी बोलत होते.यावेळी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर,मविप्र संचालक प्रविण जाधव, कादवा संचालक शहाजी सोमवंशी,सह्याद्री फार्मचे सहाय्यक संचालक मदन शिंदे,सरपंच आशा लहांगे,उपसरपंच भाग्यश्री जाधव, सुरेशमामा कळमकर, कैलास कळमकर,विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोल देशमुख, माधवराव सांळूखे,जानोरीचे माजी उपसरपंच गणेश तिडके,मोहाडी दुरक्षेत्र पोलिस हवालदार पोपट नवले,प्रेमचंद मुंढे, संदीप कडाळे,सुमित आवारी,कृष्णा भोये,बाळा पानसरे,प्रशांत पाटील आदींसह सह्याद्री देेवराई प्रतिष्ठांनचे कार्यकर्ते,के.आर.टी.हायस्कूलचे शिक्षकवृंद,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दुरक्षेत्र परिसरात वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.