लातूर रेल्वेस्थानकावरील कामाची खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्याकडून पाहणी

लातूर रेल्वेस्थानकावरील कामाची खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्याकडून पाहणी

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर

लातूरच्या रेल्वे स्थानकात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांची लातूरचे खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांनी पाहणी केली. यावेळी खा. डॉ. काळगे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती करून घेत रेल्वेच्या प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच लातूर - मुंबई या रेल्वे सेवेला असणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या रेल्वेच्या चार बोगी वाढविण्याची सूचना केली.