कुंपणच शेत खातंय.! पतसंस्थेत 6.53 कोटींचा महाघोटाळा; 36 जणांवर गुन्हा दाखल...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणारा सहकार क्षेत्रातील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ठेवीदारांचा विश्वासघात करत भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत तब्बल ₹6,53,92,042 चा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी संस्थेच्या माजी अध्यक्ष, संचालकांसह 36 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनी घाम गाळून जमा केलेल्या पैशांवर डल्ला मारत आरोपींनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बनावट कर्ज प्रकरणे खोट्या कागदपत्रांवर कर्ज काढून रक्कम लंपास केली.
ठेवींचा अपहार जमा रक्कम संस्थेत न भरता स्वतःकडे ठेवल्या खोट्या नोंदी खात्यांमध्ये फेरफार करून फसवनुक केली.
ज्यांच्यावर ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होती, त्यांनीच विश्वासघात केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांच्या लग्न, शिक्षण आणि उपचारासाठी साठवलेले पैसे धोक्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, API एस. बी. कदम पुढील तपास करत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडू नका गुंतवणूक करण्यापूर्वी ऑडिट रिपोर्ट तपासा संस्थेची पार्श्वभूमी पडताळा फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार करा...