भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, खराबवाडीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न : सभासदांच्या विविध प्रश्नांवर चर्चा
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. खराबवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सोसायटी चेअरमन ज्ञानेश्वर शिवराम कड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सोसायटीच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी संस्थेच्या व्हा.चेअरमन संगिता रघुनाथ खराबी यांच्यासह संचालक मंडळातील बाजर समिती संचालक हनुमंत अनंत कड, तानाजी ज्ञानेश्वर खराबी , अर्जुन सदाशिव कड, मच्छिंद्र जावाजी कड, संजय उत्तम कड, अमृता राजाराम खराबी, विठ्ठल दत्तात्रय बिरडवडे, राजेंद्र कृष्णाजी पवार, गणेश दिलीप जगताप, उज्वला नंदकुमार खराबी , नवनाथ गेणभाऊ कड आणि रामचंद्र कोंडिबा खराबी आदी उपस्थित होते.
सभेमध्ये सोसायटीच्या आर्थिक वर्षातील कामकाज, आर्थिक व्यवहार, कर्जवाटप व कर्जवसुली, सभासदांच्या अडचणी तसेच आगामी काळातील संस्थेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
सभासदांच्या हिताला प्राधान्य
शेतकरी आणि सभासदांना सोसायटीच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे, कर्जविषयक अडचणी सोडविणे आणि संस्थेचे कामकाज अधिक पारदर्शक व प्रभावी करण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला. सभासदांनीही विविध सूचना मांडत संस्थेच्या आगामी वाटचालीबाबत आपली मते व्यक्त केली.
दरम्यान, सभेच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक त्या बाबींना मंजुरी देण्यात आली. सोसायटीच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ आणि सभासदांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव रोहिदास विठ्ठल गव्हाणे आणि सहाय्यक गणेश बाळासाहेब निकम यांचेही योगदान राहिले.
सभेच्या शेवटी उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण सभा खेळीमेळीच्या, सकारात्मक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
vishwanathkeswad