उमरखेड तालुक्यातील मारलेगाव येथे सर्व सामान्य जनतेने राजकीय नेत्यांची काढली खरडपट्टी...
![उमरखेड तालुक्यातील मारलेगाव येथे सर्व सामान्य जनतेने राजकीय नेत्यांची काढली खरडपट्टी...](https://news15marathi.com/uploads/images/202311/image_750x_65446e20823e3.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी गावोगाव कॅन्डल मार्च करण्यात आले. तसेच रस्ते अडवून काही वेळापूरती वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. हे होत असताना; राजकीय नेत्यांची स्टंटबाजी दि. 2 नोव्हेंबर रोजी समोर आली आहे.
ज्यांनी केव्हा समाजासाठी वेळ दिला नाही. फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेतली.अशा या राजकारणी लोकांना अद्दल घडवल्याचा प्रकार मारलेगाव येथील सर्वसामान्य लोकांनी आपला रोष व्यक्त केला होता. परंतु काही राजकीय पुढारी त्या ठिकाणी येऊन पेंडॉल टाकून त्यांनी वाहतूक बंद केल्याचे निदर्शनात आल्याने; सर्वसामान्य असलेले युवा वर्ग त्या ठिकाणी येऊन राजकीय पुढार्यांना राजीनामा द्या.! नाहीतर चालते व्हा अशा शब्दात बोलून त्यांची खरडपट्टी काढली. ते राजकीय नेते खाली मुंडी घालून निघून गेले.