माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...

माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...

NEWS15 प्रतिनिधी : सुधिर शिवणकर

गोंदिया : राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा ६१ वा वाढदिवस त्यांच्या सडक अर्जुनी येथील निवासस्थानी; केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री बडोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अशोक लंजे, विजय कापगते, विरेंद्र अंजनकर, लिलेश शिवनकर, नितीन नाकाडे, उपसभापती शालींदर कापगते, जि.प.सदस्य भूमेश्वर पटले, चंद्रकला डोंगरवार, निशा तोडासे, जिवन शहारे, दिपाली मे. यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सुरेख आवाजात गझल सादर केली. तसेच जिवन लंजे यांनी नाट्यगीत व रूपाली टेंभुर्णे यांनी गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.