दीर्घ काळानंतर राजगुरूनगर बँकेला मिळतेय एक साक्षर आणि उच्चशिक्षित महिला उमेदवार, एकदा संधी देऊन बघा, ती अशी आहे की ती सिद्ध करून दाखवेल....!

दीर्घ काळानंतर राजगुरूनगर बँकेला मिळतेय एक साक्षर आणि उच्चशिक्षित महिला उमेदवार, एकदा संधी देऊन बघा, ती अशी आहे की ती सिद्ध करून दाखवेल....!

 News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

 खेड (राजगुरूनगर): राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या प्रचाराला तालुक्यात रंगत चढल्याचे आता दिसू लागले आहे.

 राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावेळी राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनल व समोर भीमाशंकर सहकार पॅनल यांच्यात सरळ लढत होणार आहे. या दोन पॅनलमधील वैशिष्ट्य म्हणजे भीमाशंकर सहकार पॅनलमध्ये या अगोदर बऱ्याच वेळा संधी भेटलेले व अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक म्हणून काम केलेले उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. तर, राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलमधील सर्व उमेदवार यांचे वैशिष्ट्य म्हणजे पॅनल मधील सर्व उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत.

 या राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलमध्ये महिला प्रतिनिधी म्हणून अश्विनी राजेंद्र पाचारणे या निवडणुक लढवत आहेत. त्या उच्च शिक्षित तर आहेच पण मितभाषी आणि त्यांनी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून उल्लेखनीय असे सामाजिक काम केले आहे. त्याचा त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे.

त्या तुलनेत पुढील पॅनलच्या महिला उमेदवार यांच्या शिक्षणाच्या बाबत न बोललेले बरे राहील. अन त्यांनी या अगोदरही बँकेत संचालक म्हणून काम केले आहे त्यावरही बऱ्याच सभासद व कर्मचारी आपली उघड नाराजी बोलून दाखवत आहेत. सभासदांनी निवडून दिलेला प्रतिनिधी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण अश्विनी पाचारणे यांना निवडून दिल्यावर सभासद बांधवाच्या समोर येणार आहे. अश्विनी पाचारणे या बँकेच्या निवडणुकीत नवख्या असल्या तरी, त्या उच्चशिक्षित असल्याने त्यांना बँकेचे कामकाज समजून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. त्या तुलनेत पुढील महिला उमेदवार यांना संचालक पदावर काम करूनही अजूनही बँकेचा "ब" ही समजला नसल्याची प्रतिक्रिया अनुभव आलेल्या सभासदांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे अश्विनी पाचारणे यांना ही निवडणुक सोप्पी झाल्याचे बोलले जात आहे.

 अश्विनी पाचारणे यांची या निवडणुकीत अजून एक जमेची बाजू म्हणजे त्यांचा तालुक्यातील नात्या गोत्याचा मोठा गोतावळा आहे. त्याचा नक्कीच फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही. अश्विनी पाचारणे या स्वतः यशस्वी उद्योजिक असल्याने त्यांना प्रशासन कसे हाताळायचे आणि सभासदांच्या प्रश्नांची कशी सोडवणूक करायची याचे उत्तम जाण असल्याने त्या त्यांच्या पदाला योग्य न्याय देतील यात तिळमात्र शंका नाही.

 खेड तालुक्यात पाचारणे घराण्याकडे एक सामाजिक उपक्रम व समाजासाठी अहोरात्र झटणारे कुटुंब म्हणून पाहिले जाते. पाचारणे कुटूंबाच्या मदतीने अनेक गरीब कुटूंबात आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यांनी बचत गट,संगीत महोत्सवाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. एवढेच नाही तर, दरवर्षी तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब मुलांना शालेय शिक्षणासाठी ते सदैव मदत करत असतात. या सारखे इतरही उपक्रम अश्विनी पाचारणे राबवत असतात यातून त्यांचा थेट सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क येत असतो. याचा त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आता तालुक्यातील बँक सभासद यांच्या तोंडून होताना दिसत आहे.

 राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रथमच इतकी उच्चशिक्षित महिला निवडणूक लढवत आहे. त्यात ती अशी महिला आहे की तालुक्यातील अनेक गरीब कुटूंबाची आधार बनली आहे. अशा उद्ययमूख उच्चशिक्षित महिलेला एकदा संधी तर देऊन बघा नक्की ती स्वतःला तिच्या अनुभवातून सिद्ध करून दाखवेल अशी प्रतिक्रिया राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलचे उच्चशिक्षित उमेदवार साद घालताना दिसत आहे. यातून नक्कीच अश्विनी पाचारणे आपला विजय खेचून आणतील आणि एक उच्चशिक्षित संचालक म्हणून बँकेत आपला ठसा उमटवतील यात शंका नाही.