ग्रामपंचायत उमेदवारांसाठी आनंदाची बातमी.! निवडणूक आयोगाने वाढवला वेळ...

NEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई
राज्यातील उर्वरित ग्रामपंचायत निवडणुक आणि रिक्त असलेल्या जागांकडे अनेक इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून असताना; राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या.! तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली.
तर त्यानुसार नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.
परंतु, निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत वाढवली असून, राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे अधीकृत पत्र देखिल प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.