मला राजकीय प्रश्न विचारू नका, पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य.! अजित पवारांच्या खांद्यावर जबाबदारी...

मला राजकीय प्रश्न विचारू नका, पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य.! अजित पवारांच्या खांद्यावर जबाबदारी...

NEWS15 प्रतिनिधी : आशिष ढगे पाटील

पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं भाष्य केलं असून, राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्षांमुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

महत्वाचं म्हणजे.! भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार करत असताना; पवारांच्या या वक्तव्यामुळं आणि निर्णायक क्षणी अजित पवारांवर ही जबाबदारी दिल्यानं; इतर पक्षांसाह राष्ट्रवादीने देखील या पोटनिवडणुकांसाठी तयारी सुरु केली असल्याचं बोलल जात आहे. तर स्थानिक पातळीवर सर्वच पक्षाचे पदाधिकारी बैठका घेऊन निवडणुकीचे नियोजन करत असून, दोन्ही ठिकाणी अनेक उमेदवार इच्छुक असल्याचे समोर आले आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे रविवारी झालेल्या कृषी प्रदर्शनात; शरद पवार यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात भाष्य केले. '' मला राजकीय प्रश्न विचारू नका. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांबाबत तुम्ही अजित पवार यांना विचारा,' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यातून एक प्रकारे ही पोटनिवडणूक जिंकण्याची सर्व जबाबदारी त्यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर दिल्याचे बोलले जात आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला निकाल जाहीर होणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी अजित पवार यांनीदेखील माध्यमांशी बोलताना आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघासह कसबा विधानसभा मतदारसंघावरही दावा असल्याचे अप्रत्यक्ष सांगितले होते.